नमस्कार मित्रांनो आज आपण अभ्यास कसा करायचा? याविषयीं जाणून घेणार आहोत. अभ्यास करायचा कंटाळा येत असतो. परंतु अभ्यास करणे तुमच्या सुखद भविष्यासाठी गरजेचं आहे. अभ्यास करताना झोप लागणे, अभ्यास करूशी न वाटणे. किती पण अभ्यास केला तरी लक्षात न राहणे. यावर आपण जपानी विध्यार्थ्यांची अभ्यास करायची पद्धत जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊया
जपानी विध्यार्थी पाच वेगवेगळ्या टेकनिक ने अभ्यास करतात. त्या पाच टेकनिक काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
1)कैडणं होशिकी
या टेकनिक नुसार तुम्हाला जो धडा वाचायचा आहे. त्याला छोट्या छोट्या भागात वाटा त्यानंतर एक एक भाग चांगल्या प्रकारे वाचून समजून घेऊन पुढच्या भागावर जा.
2)विजुलीझशन आणि मनेमोनिक्स
आपल्याला कोणतीही गोष्ट चित्राद्वारे जास्त लक्षात राहते. त्यामुळे तुम्हाला धड्याच्या भागाना छोट्या छोट्या चित्ररूपी गोष्टीत बदला. आपल्या मेंदूत वेगवेगळ्या प्रकारचे चित्रांचा आणि गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी लक्षात ठेवा.
3)ऍक्टिव्ह रेकॉल
तुम्ही ज्या गोष्टी छोट्या भागात वाचल्या आहेत आणि त्यांचा चित्ररूपी विचार केला आहे. त्या गोष्टींबद्दल पुस्तक बंद करून आठवून कागदावर लिहा . ज्यामुळे तुमची स्मरण शक्ती वाढेल व त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील.
4)ओंडोकू
धड्यामधील मुख्य गोष्टी मोठयाने वाचा व वाचत असताना स्वरात किंवा तालात वाचा. कारण स्वरात वाचलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतात.
5)जिको सेट्सअमई
या टेकनिक मध्ये तुम्ही असा विचार करायचा कि तुम्ही कोणाला तरी तो धडा शिकवत आहात. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल व ती गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात राहील.
धन्यवाद
#studytips #studytechniques #studytricks #study #marathi