नमस्कार मित्रांनो आपण या ब्लॉगपोस्ट मध्ये 10 करोड रुपयाचं घर 150 रुपयात का विकलं? तुम्हाला प्रश्न पडेल कि हे कसं शक्य आहे. एवढा मोठा मूर्ख पण कोण करू शकतो? तर असं एका व्यक्तीने केलं आहे पण त्यामागे त्याने जे डोकं लावलं. त्याविषयी ऐकून तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसेल. तर चला जाणून घेऊया असं त्या व्यक्तीने काय केले?
मित्रांनो फोटो मध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला लोकं मूर्ख समजतं होते. कारण तो त्याच 10 करोड रुपये किमतीचे घर 150 रुपयात विकायला निघाला होता. पण लोकांना त्याच्या मास्टर प्लॅन बद्दल माहित नव्हतं. ह्या व्यक्तीच नाव डस्टन लो आहे, त्याला व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे घर विकून कर्ज फेडावं लागणार होतं.
लोकांना त्यांचं घर आवडत तर होतं पण किमत जास्त असल्यामुळे कोणी ते घर विकत घ्यायला तैयार नव्हतं. त्यांनी त्यांच्या घराची किमत 10 करोड रुपयावरून 5 करोड केली. तरी कोणी त्यांचं घर विकत घ्यायला तैयार नव्हतं. शेवटी ते एक मास्टर प्लॅन बनवतात. ते त्यांच्या घराचे 150 रुपयाचे लॉटरी तिकीट काढतात.
मार्केटिंग चं चांगल नॉलेज असल्यामुळे त्यांची लाखो तिकीट लोग खरेदी करतात. मेरी सिगर नावाची महिला ही लॉटरी जिंकते तीला 150 रुपयात घर भेटत. लाखो तिकीट विकून ह्या व्यक्तीकडे 15 करोड रुपये येतात. तो या पैशाने स्वतःच कर्ज फेडतो. त्यासोबत 2 करोड रुपये गरिबांना दान करतो.
यावरून तुम्हाला एक गोष्ट शिकायला भेटेल कि कोणत्याही समस्याच समाधान असते. ते कसे काढायचं हे आपल्या नॉलेज वर आधारित असते.
#smartwork #smartmind #₹150Home #motivation #education