नमस्कार मित्रांनो आज आपण कोणत्याही व्यक्तीने कधी गप्प रहावे? याबद्दल जाणून घेणार आहोत. कारण प्रत्येक ठिकाणी बोलण्याची गरज नसते. आपण काही ठिकाणी शांत राहिलं तर ते आपल्यासाठी चांगलंच असते. आपण कोठे गप्प राहिले पाहिजे? हे आपण समजून घेऊया.
1) जेव्हा तुम्ही रागात असाल
मित्रांनो आपल्याला काही कारणामुळे राग येणे,हे सहाजिक आहे. परंतु त्या रागाच्या भरात कोणाला काही बोलणे हे आपल्याला महागात पडू शकते. कारण राग आणि वादळ एकसारखे असते. ते गेल्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो. ज्यामुळे रागात स्वतःला शांत ठेऊन गप्प राहण्याचा पूर्ण प्रयत्न करा.
2) जर तुम्हाला पूर्ण गोष्ट माहित नसेल.
मित्रांनो जर कोणी कोणत्याही गंभीर मुद्द्यावर बोलत असेल. तर अशावेळी आपल्याला त्या मुद्द्याविषयीं पूर्ण माहिती आहे का? याचा विचार करून बोलले पाहिजे. कारण आपण काही चुकीचं बोललं तर त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात.
3) जर न ओरडता बोलता येत नसेल
मित्रांनो आपल्याला काही लोकं भेटतात जे नेहमी मोठ्या आवाजात म्हणजे ओरडून बोलत असतात. ज्यामुळे लोकांना त्यांच्या बोलण्याचा त्रास होतो. यामुळे अशा लोकांनी कृपया जेवढं होईल तेवढं गप्प राहिलं पाहिजे.
4)तुमचं गप्प राहणं नातं वाचवत असेल
मित्रांनो कुटुंबात काही अश्या व्यक्ती असतात, ज्यांना भांडण करायला आवडत. त्यांच्या भांडणामुळे नातं तुटू शकतं, याचा ते विचार करत नाही. पण तुम्ही काही गोष्टी नजरअंदाज करून गप्प राहिलं पाहिजे.
5)जेव्हा तुम्ही भावनिक असाल
मित्रांनो जेव्हा तुम्ही भावनिक असाल तेव्हा गप्प रहा. कारण भावनिक वेळी कोणताही व्यक्ती कमजोर असतो. अशावेळी तो काही अशा गोष्टी बोलून जातो. ज्याचा त्याला नंतर पश्चाताप होतो. त्यामुळे तुम्ही भावनिक असताना गप्प राहिलं पाहिजे.
धन्यवाद
#silent #gapparahane #motivation #marathi